(पुणे)
फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर शुक्ला यांना क्लीन चिट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याबद्दल न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला आहे. त्यामुळे माजी पोलिस आयुक्त शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत.
पोलिसांनी दिली होती क्लीन चिट
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या शुक्ला यांनी काही आमदार, मंत्र्यांचे फोन टॅप केले होते. तसेच यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास देखील झाला. मात्र या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर रश्मी शुक्ला यांना पोलिस विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. शुक्ला यांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून हे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते.