(डिजि टेक)
भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. यासाठी जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्याची पद्धत.
पेटीएम अकाऊंट
फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुमचं Paytm account तात्पुरतं ब्लॉक करता येतं. त्यासाठी पद्धत खूप सोपी आहे.
- पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा. लॉस्ट फोनचा पर्याय निवडा त्यानंतर एक वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर नोंदवा.
- त्यानंतर सर्व डिवाइसेसवरून लॉग-आउट करण्याचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 हेल्प लाइनची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा. इथे ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ चा ऑप्शन निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
- त्यानंतर ‘एनी इश्यू’ वर क्लिक करा आणि सर्वात खाली ‘मेसेज अस’ बटनवर क्लिक करा. आता तुम्हाला अकाऊंट ऑनरशिपचा पुरावा द्यावा लागेल ज्यात डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहार, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहारचा एक कंफर्मेशन ईमेल किंवा एसएमएस, फोन नंबरच्या मालकीचा पुरावा किंवा हरवलेल्या फोनची पोलीस कंप्लेंट प्रूफ म्हणून वापरता येईल. ही माहिती दिल्यानंतर पेटीएम तुमचं अकाऊंट ब्लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला कंफर्मेशन मेसेज मिळेल.
गुगल पे अकाऊंट
जर तुमच्या फोनवर पेमेंटसाठी गुगल पे अकाऊंटचा वापर करत असाल तर फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास ब्लॉक करता येईल.
- Google Pay Account ब्लॉक करण्यासाठी युजर्स हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करू शकता आणि आवडीची भाषा निवडू शकता.
- इथे ‘अदर इश्यू’ चा पर्याय निवडा. त्यानंतर एक्सपर्टकडे बोलण्याचा पर्याय निवडा जो तुमचं गुगल प्ले अकाऊंट ब्लॉक करण्यास मदत करेल. तसेच अँड्रॉइड युजर आपला डेटा रिमोटली देखील डिलीट करू शकतात.
फोन पे अकाऊंट
तुमचं फोन पे अकाऊंट देखील तुम्ही सहज ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
- फोन पे युजर्सना 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करावा लागेल. आवडीची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या Phonepe Account मधील एखादी समस्या रिपोर्ट करायची आहे का? त्यानुसार नंबर दाबा.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर टाका आणि कन्फर्मेशनसाठी एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर ओटीपी प्राप्त न झाल्याचा पर्याय निवडा. तुम्हाला सिम किंवा डिवाइस हरवल्याची पर्याय दिला जाईल, त्यातून निवड करा.
- त्यानंतर एक प्रतिनिधीकडे कॉल ट्रान्सफर केला जाईल, जे काही फोन नंबर, ईमेल आयडी, शेवटचं पेमेंट, इत्यादी माहिती विचारतील. त्यानंतर फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्यास तुमची मदत केली जाईल.
अशाप्रकारे हरवलेल्या फोनमधील पेमेंट्स अॅप्स ब्लॉक करता येतील.