पहिला फोटो पहा , आपण जसजशी मान खाली झुकवतो तसतशी डोके स्थिर धरताना मानेवर ताण वाढत जातो . सरळ असताना केवळ ५ किलो असलेले वजन जेव्हा आपली मान ६०° मध्ये झुकते तेव्हा २७ किलोचे झालेले असते !
याला Tech neck किंवा Text neck असे म्हणतात . मोबाईल वापर वाढू लागल्यावर केवळ मोबाईलकडे बघण्याचे दुष्परिणामही लक्षात येऊ लागले . मोबाईल व्यसन तर वेगळीच गोष्ट आहे !
आणि मुख्य म्हणजे मोबाईलचा वापर लहानपणापासून होत असल्याने लहान वयापासूनच मानेचे दुखणे मागे लागू शकते .
मान झुकवून मोबाईल वापरण्याने मानेच्या मणक्यांची ठेवण बदलते, स्नायूंवर खूप ताण येतो , मज्जारज्जूवर ताण येतो, पाठीला बाक येतो .
आता हे वाचत असताना तुमची मान किती अंशात झुकली आहे व त्यानुसार किती ओझे सहन करत आहे हे बघा बरे! आणि घरातील इतर मोबाईल वापरताना किती अंशात मान झुकवतात तेही बघा !
यापासून सुरक्षा काशी मिळवायची ?
^ मोबाईल वापर नियंत्रित करा
^ मोबाईल पूर्ण खाली न धरता चेहऱ्यासमोर धरा म्हणजे मान केवळ ०-१५° कोनातच झुकेल .
^ कम्प्युटर वापरताना मान सरळ राहील अश्या पद्धतीने स्क्रिन ठेवा.
^ मोबाईल किंवा कामापासून नियमित ब्रेक घेऊन डोळे व मानेच्या स्नायूंना विश्रांती द्या .
^ स्नायू सैलवण्यासाठी व्यायाम करा.
^ नियमित व्यायाम करून मानेचे व पाठीचे स्नायू बळकट करा
^ मान किती झुकतेय याकडे सजगपणे लक्ष द्या !
आजाराचे प्रतिबंध बऱ्याचदा फुकट असते, पण जर आजारासाठी शस्त्रक्रिया लागली तर ती लाखों रूपायांची असू शकते! निवड तुम्हाला करायची आहे!
– डॉ. प्रिया प्रभू , MD, मिरज