[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
रत्नागिरीतील सामान्य माणसातील दिलदार व्यक्तीमहत्व फैयाज मुकादम यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. मुकादम यांच्या अनेक हितचिंतकांनी त्यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या तर काहींनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. त्यामध्ये एक भेटवस्तू अनोखी व गरीब गरजू लोकांसाठी तितकीच महत्त्वाची होती. फैयाज मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त JMBR ग्रुपचे बशीर भाई हजवानी यांनी TATA WINGAR रुग्णवाहिका गाडी फैयाज मुकादम यांच्या नावाने रजिस्टर केली आहे. ही गाडी जानेवारी महिन्यात रत्नागिरीकरांच्या सेवेत दाखल होणार असून सवलतीच्या दरात या रुग्णवाहिकेची सेवा देण्यात येणार आहे.
गेले काही वर्षापासून गोरगरीब जनतेला सवलतीच्या दरात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेवा देता यावी या साठी फैयाज मुकादम धडपड करत होते. प्रत्येकासाठी आधार देणारा हात अशीच फैयाज मुकादम यांची ओळख आहे. त्यांचे बंधुराज इस्माईल मुकादम हे देखील मेडिकल व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत असतात. गुरुवारी केळये ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीच्या वेळी बशीरभाई यांचा फोन आला आणि त्यांनी काल 30 डिसेंबर रोजी फैयाज मुकादम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने TATA WINGAR रुग्णवाहिका गाडी त्यांना समाजसेवेसाठी भेट देऊन वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. या अनोख्या भेटीमुळे बशीरभाई हजवानींची गरीब गरजू घटकातील लोकांबाबत तळमळ दिसून येते. यामुळे अनेकांनी त्यांचे देखील कौतुक केले जात आहे.
माझ्या वाढदिसानिमित्त बशीरभाई हजवानी यांनी थेट रुग्णवाहिका गाडी बुक केलीय. बशीरभाईनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थक ठरवू. यासोबत गरीब-गरजू बांधवांना रुग्णवाहिकेतून सेवा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू…
– फैयाज मुकादम