(रत्नागिरी)
फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम गेली दोन महिने बंद स्थितीत असून त्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. या इमारतीच्या कामातही सातत्य नाही. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती देवरुख यांना सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे, असे आर.टी.आय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र चे संगमेश्वर तालुक्याचे सक्रिय कार्यकर्ते सुभाष लांजेकर यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात योग्य ती कार्यवाही झाली नाही तर महासंघाचे वतीने दिनांक 06 डिसेंबर 23 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी आर.टी.आय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र चे संगमेश्वर तालुक्याचे वतीने अध्यक्ष मनोहर गुरव यांचे मार्गदर्शनाखाली उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.तसेच ग्रामसभेत देखील हा मुद्दा उपस्थित करून काम बंद असल्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्याचे ठरले आहे.