( रत्नागिरी / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस कोंड्ये येथे दोन बिबट्यांचा रस्त्यावर वावर दिसून येत असल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालकांना फुणगुस कोंड्ये येथील गेट समोर दोन बिबटे वावरताना दिसून आले. या ठिकाणी आठ दिवसातून हे बिबटे दिसून येतात असे बोलले जात आहे. जवळपास 4-5 बिबटे या ठीकाणी आहेत असे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. रत्नागिरी 24 न्यूज वर सर्वात आधी बातमी वाचा. या बिबट्यांच्या वावरामुळे गावातील लोक आणि वाहन चालक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरतात. त्यामुळे या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा आणि नागरिकांना या भीतीपासून सुटका करावी अशी मागणी होत आहे.