(रत्नागिरी)
फणसवळे ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करण्यात येऊन कोंडवाडीचे गावकर श्री .संतोष सोनू आंबेकर यांची उपस्थित ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच सर्व आजी-माजी सदस्य या सर्वांनी एकमताने बिनविरोध निवड केली.
या सभेला सरपंच श्री.निलेश नामदेव लोंढे, उपसरपंच श्री.गौरव सु.नाखरेकर, ग्रामसेवक श्री.सुवरे, ग्रा.प.सदस्य श्रीधर श्री .सनगरे, स्वप्निल भ.पवार, विनया विष्णू सुर्वे, माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र पवार, माजी अध्यक्ष विभाकर दळवी, संतोष रेवाळे, अनंत पवार, पोलिस पाटील विष्णू ठिक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष यांना पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.