(मुंबई)
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. विविध उद्घोषणा करून प्रवाशांना याबाबत जागृतही केले जाते. तरी देखील अनेकदा रेल्वे प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालाड रेल्वे स्थानकावरील एका दुःखद घटनेत प्लॅटफॉर्म 3 वर उभ्या असताना एका 17 वर्षीय तरुणाला वेगवान लोकल ट्रेनने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला. मयंक अनिल शर्मा असे पीडित तरुणाचे नाव असून तो मालाड स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या काठावर जेवणाचा डबा धुत असताना ही घटना घडली. तो मालाड मालवणी येथे राहणारा आहे. प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत
https://twitter.com/Rajmajiofficial/status/1674739770025541633?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1674739770025541633%7Ctwgr%5E618d6591d78a423fdc672d6330c078047932792e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fmaharashtra%2Fa-17-year-old-boy-died-on-the-spot-after-being-hit-by-an-ac-local-while-he-was-washing-a-lunch-box-on-the-edge-of-the-platform-at-malad-station-watch-video-473327.html
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजता दोन तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील कट्ट्यावर बसून एकत्र जेवले. यानंतर जेवणाचा डब्बा आणि हात धुण्यासाठी ते प्लॅटफॉर्मच्या काठावर उभे राहीले. मात्र अचानक चर्चगेटच्या दिशेने बोरिवलीकडे जाणारी वातानुकूलित जलद लोकल आली. मात्र त्या दोघांपैकी एका तरुणाला लोकल आल्याचे समजलेच नाही आणि त्याला जोरदार धडक देऊन लोकल पुढे निघून गेली.
जोरदार बसलेल्या धडकेमुळे तो तरुण प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत फेकला गेला. लोकलने दिलेल्या धडकेत त्याच्या कानातून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. त्याला पुढील उपचारासाठी शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे घेऊन जाण्यासाठी ऑन ड्युटी स्टेशन मास्तर यांनी पोलीस शिपाई राठोड यांना सूचना केली. हमालाच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने शताब्दी हॉस्पिटल येथे तरुणाला नेले असता दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.