(राजापूर / तुषार पाचलकर)
गेल्या वीस वर्षापूर्वी पासून राजापूर तालुक्यातील करक-कारवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत मंजूर झाली आहे. परंतु करक आणि कारवली या दोन गावातील ग्रामस्थांची मागणी होती. सदर आरोग्य केंद्र हे आमच्याच गावात व्हायला हवं या दोन गावांच्या वादामध्ये गेले वीस वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचे काम सुरू होवू शकले नाही, त्यामुळे सदर आरोग्य केंद्र हे आत्तापर्यंत भाड्याच्या जागेत आहे. ज्या भाड्याच्या जागेमध्ये हे आरोग्य केंद्र ते मोडकळीस आल्याने ती जागा सध्या रुग्णांसाठी, आरोग्य केंद्राच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांसाठी धोकादायक आहे.
याबाबत परिसरातील अनेक ग्रामस्थांनी- पुढाऱ्यांनी पाठपुरावा केला परंतु सदर प्रश्न हा जैसे थे या अवस्थेत आजपर्यंत होता. काही दिवसापासून पाचल विभागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि पांगरी गावचे सरपंच अमर जाधव तसेच विभाग प्रमुख शैलेश साळवी युवकांचे विभाग प्रमुख सुनील गुरव यांनी या प्रश्नाकडे भैय्या सामंत यांना गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. यासाठी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख अश्फाक हाजू राजापूर तालुका प्रमुख दीपक नागले उपतालुकाप्रमुख नाना कोरगावकर यांनी याबाबत पाठपुरावा करून पालकमंत्री उदय सामंत व रत्नागिरी – शिंधुदुर्ग खासदार पदाचे उमेदवार भैया सामंत यांना याबाबत पत्रव्यवहार केला. यामुळे आज दिनांक 11 जानेवारी रोजी पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी मंजूर केलेले आरोग्य केंद्र करक- कारवली या नवीन इमारतीच्या बांधकामाची निविदा आज जाहीर करण्यात आली. सदरची बाब ही पाचल आणि परिसरातील ग्रामस्थांसाठी खूप आनंदाची बातमी असल्याने परिसरातून पालकमंत्री उदय सामंत तसेच किरण उर्फ भैया सामंत यांनी तात्काळ दखल घेतलेल्या कामाची प्रशंसा होत आहे.
पाचल विभागातून विभाग प्रमुख अमर जाधव तसेच विभाग प्रमुख शैलेश साळवी यांनी पालकमंत्री तसेच भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काही महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेंव्हापासून आपल्या विभागातून छोटी मोठी कामं रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख अश्फाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, उपतालुकाप्रमुख नाना कोरगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.तयामुळे परिसरातील युवा वर्ग तसेच इतर जनता यांच्या कामगिरीचं कौतुक करत आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावल्याने जनतेचा विश्वास आमच्यावर दिवसेंदिवस वाढत असल्याने
प्रत्येक काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. असं मतं विभाग प्रमुख अमर जाधव, विभाग प्रमुख शैलेश साळवी यांनी यावेळी व्यक्त केलं.