(खेड)
खेड येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने 2024 ची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा तथा शिक्षक स्नेहमेळावा डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा नेते प्रमोद मोहिते, सचिव दीपक मोने, कार्याध्यक्ष संतोष रावणंग, पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, माजी संचालक संतोष उतेकर, नवनिर्वाचित संचालक राजेंद्र चांदिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुका नेते श्री.विलास धामणे यांनी केले. याप्रसंगी नवनियुक्त केंद्रीय प्रमुख पदोन्नती मिळालेले विलास धामणे,भास्कर जंगम, दिलीप सावंत, दीपक जगताप, मंगेश भोसले, दत्ताराम निकम, रजनी शिंदे, विश्वनाथ पवार यांचा तसेच नासा व इस्रो दौऱ्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा, क्रीडा स्पर्धा व खेड तालुक्यातून शिक्षक संघाचे पतपेढीवर निवडून आलेले उमेदवार राजेंद्र चांदिवडे, आदर्श शिक्षक सुधाकर पास्टे यांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील प्रत्येक शाळेला सदर दिनदर्शिका मोफत वितरित केली जाते. शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात दिनदर्शिका प्रकाशनाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खेडेकर, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अखलाक परकार, पदवीधरचे अध्यक्ष अनंत मोहिते, पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष विनोद घडशी तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या शितल देवळेकर, विनिता धामणे, सिद्धी जाधव, ऋतुजा चांदीवडे,सुखदा पेंडसे, सनिरीता बाईत,शिल्पा ढवारे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक संघाच्या विचारधारेने प्रेरित होऊन जनार्दन गावणकर, विरेंद्र गावित व जीवन गर्कळ यांनी शिक्षक प्राथमिक संघात जाहीर प्रवेश केला. शिक्षक संघाच्यावतीने त्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले.
अनेक मान्यवरांनी शिक्षक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संघाचे सचिव एकनाथ पाटील यांनी केले, तर माजी संचालक श्री. संतोष उतेकर यांनी सर्वांचे आभार मानले. दिनदर्शिका समितीमध्ये काम केलेले गणोजी माने, कृष्णा गंभीरे, मंगेश झावरे, राहुल तुगांवकर यांचा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.