(रत्नागिरी)
आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्यावतीने मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय मालगुंड या प्रशालेत विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांची आयुष्यमान गोल्ड कार्ड काढण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडचे आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बिपिन परकर यांच्याशी संपर्क करून आयुष्यमान भारत कार्ड संबंधी माहिती सांगून चर्चा केली व विद्यार्थ्यांचीही कार्ड काढणे आवश्यक असल्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र व बळीराम परकर विद्यालय यांच्या सोयीनुसार दिनांक 19 /10 /2023 रोजी या कॅम्प चे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले. सदर शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक डॉ. निवेडकर व श्री. बारीन्गे, श्रीम. साखरकर यांच्या नियोजनानुसार संपन्न झाले. यावेळी गटप्रवर्तक श्रीमती आढाव, मालगुंड येथील, आशा सेविका व ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर उपस्थित होत्या.