(मुंबई / किशोर गावडे)
वर्षा महेंद्र भाबल या कोकणातील एका खेड्यात जन्मलेल्या, गावातील पहिली दहावी पास झालेल्या, स्वकर्तृत्वाने स्वतःचे जीवन घडविलेल्या एका स्त्रीचा प्रेरणादायी “जीवन प्रवास” न्यू स्टोरी टुडे चे प्रथम प्रकाशन होते. वर्षा महेंद्र भाबल लिखित, “जीवन प्रवास” या पुस्तकाचा शानदार प्रकाशन सोहळा, रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता वडाळा नाडकर्णी पार्क, बीपीटी जुनी वसाहत, मुख्य क्रीडांगणावर संपन्न झाला.
यावेळी मुख्य व्यासपीठावर समारंभ अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य गाबित समाजाचे अध्यक्ष सुजय गोपाळ धुरत व गाबीत समाज वडाळा विभागाचे अध्यक्ष श्री. रामचंद्र ( बबन ) सारंग, आणि प्रमुख पाहुणे लेखक व समीक्षक प्राध्यापक, अविनाश कोल्हे, न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ. प्रकाशिका अलका देवेंद्र भुजबळ व पुस्तकाची लेखिका व निमंत्रक वर्षा महेंद्र भाबल, शांतीलाल ननावरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य गाबित समाजाचे अध्यक्ष सुजय धुरत आपल्या शुभेच्छापर मार्गदर्शन करताना म्हणाले, वर्षा महेंद्र भाबल यांनी स्वतःमध्ये माणुसकी जागृत ठेवून आयुष्यात येणाऱ्या सर्व चढउतारात महेंद्र आणि वर्षा या दोघांनी धरलेला हात कधी सुटू दिला नाही. चांगल्या संस्कारातील त्यांनी दोन गोष्टी जपल्या, त्या म्हणजे “जोडणे” आणि “जपणे.” आपल्या जीवन प्रवासात त्यांनी निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांची संख्याही वाढवत नेली. त्यांनी आपल्या आयुष्यात जी माणसे जोडली ती त्यांच्या आयुष्यभराची कमावलेली संपत्ती होय, अशा शुभेच्छापर सदभावना सुजय धुरत यांनी व्यक्त केल्या. वर्षा भाबल यांनी देखील आपल्या मनोगतातून आपला जीवन प्रवास कसा झाला व आपला ५७ वर्षाचा कालावधी कसा घडला. याचा मुद्देसूद संदर्भासहित उलगडा करून रसिकांची त्यांनी मने जिंकली.
यावेळी, महेंद्र भाबल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य बांधव उपस्थित होते. यावेळी प्रदीप भाबल, दिलीप हिरनाईक चौघुले, विजय जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजात यशस्वी कामगिरी केली अशा डॉ.सुशांत भाबल, डॉ.जुई प्रल्हाद भाबल, डॉ. भक्ती टिकम, डॉ. अनिल पराडकर डॉ सुमीत सतिश माळगावकर यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कदम व महेंद्र भाबल यांनी केले.