(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे विल्ये बौद्धवाडी येथील प्रसिद्ध कवि दिवंगत बाळकृष्ण गोविंद कांबळे तथा “बबनकवी” यांचा प्रथम स्मृतीदिन 21ऑक्टोबर रोजी मौजे विल्ये येथे त्यांच्या राहत्या घरी कुटुंबियांनी आयोजित केला आहे.
दिवंगत बबनकवी यांनी आपल्या लेखनातून अनेक धम्म गीते तसेच नाट्यप्रयोग लिहिले आहेत, जलसा या वेगळ्या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून धार्मिक तसेच सामाजिक प्रबोधन केले. त्यांच्यावर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता, त्या चळवळीतील एक विचारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.
त्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 21ऑक्टोबर रोजी सकाळी 11वाजता त्यांच्या कुटुंबीयांनी व येथिल स्थानिक कमिटीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.