[ रत्नागिरी/प्रतिनिधी ]
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला ई केवायसी प्रमाणीकरणासाठी दि. ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यासाठी ई-केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अॅपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वतः ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावरील बायामेट्रीक पद्धतीने ते करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी प्रतिलाभार्थी प्रतिबायोमेट्रीक प्रमाणिकरणाचा दर १५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ जुलैअखेर ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.