आज ७४ वा प्रजासत्ताक दिन आहे. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटना अमलात आणली गेली आणि भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. यापूर्वी आपला हा देश एकसंघ नव्हता. ह्या देशाच्या तुकड्या तुकड्यावर अनेक राजे राज्य करत होते. त्यांची जी संस्थाने होती ती सार्वभौम होती. ही संस्थाने म्हणजे वेगळे देशच होते. त्यांच्या सतत आपापसात लढाया होत दुसऱ्याचे राज्य बळकावून आपले राज्य मोठे कसे करता येईल ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत. इंग्रजांनी या साऱ्या राजांना हरवून आपला एकछत्री अंमल सुरु केला तेव्हा त्याला एका अखंड देशाचे स्वरूप आले.
१९४७ साली जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले. देश लोकशाहीच्या दिशेने चालू लागला तेव्हा देशातील जवळपास ५६१ संस्थानातील राजघराणी हि अस्वस्थ झाली. स्वतंत्र भारताशी त्यांना काही घेणे देणे नव्हते. इंग्रज निघून गेल्यावर आपले संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र होणार ह्याच स्वप्नात ते होते. परंतु संस्थानातील बहुसंख्य जनतेला आता राजेशाही नको होती तर हवी होती लोकशाही. पुढे ही संस्थाने भारतीय संघराज्यात सामील झाली.
देशाची घटना अमलात आणून आज ७४ वर्षे झाली. आपल्या देशाने बरीचशी प्रगती केली काही आघाड्यांवर तो मागेही राहिला. परंतु देशाची लोकशाही मात्र एकसंघ राहिली. अनेक स्वातंत्रसैनिकांचे बलिदान ह्यातून आपला देश उभा राहिला आहे. आपण विकासाच्या दृष्टीने बराच पल्ला गाठला आहे. लोकशाही बळकट असणे हे देशाच्या दृष्टीने महत्वाचेअसते.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. तत्पूर्वी, २६ जानेवारी १९५० रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील १८ वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस अधिकृतपणे स्वातंत्र्यदिन म्हणून घोषित करण्यात आला.
भारतासारखे निरनिराळे धर्म, भाषा, जवळपास ६००० जाती असलेल्या देशात लोकशाही टिकून राहणे ही खरोखरच एक अदभूत गोष्ट आहे. ह्याचे श्रेय आपल्या घटनेला आणि राज्यकर्त्यांना जाते हे निर्विवाद सत्य आहे. लोकशाही विरोधी प्रवृत्ती या कितीही ताकदवर भासत असल्या तरी त्यावर मात करून आपली लोकशाही हीच जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून चिरायू होवो हीच सदिच्छा! आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेले आहे.
तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा आणि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन !