(खेड /भरत निकम)
पोसरे बौद्धवाडी येथे ८ फुटी अजगर घरामध्ये आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोसरे बौद्धवाडी येथील संदिप गमरे यांच्या घराच्या मागील बाजुस गुरुवारी रात्री १०:३० वाजता अजगर जातीचा भलामोठा अजगर आढळुन आला. घरात अजगर आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली.
गमरे यांनी क्षणाचाही विलंब न करता वल्ड फॉर नेचर संस्थेच्या सर्पमित्रांना कळविले. माहिती मिळताच या संस्थेचे सर्पमित्र प्रथमेश पवार व तुषार गमरे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या अजगरास त्वरीत सुरक्षित पकडले. अजगर पकडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अजगर पकडल्यावर त्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. हा अजगर उंदीर किंवा घुस यांच्या मागावर आला असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. पोसरे हे गाव दुर्गम व जंगली भागात असल्याने येथे सापांसह वेगवेगळे प्राणी आढळतात आणी मग अश्या ठिकाणी अजगर मिळणे स्वाभाविकच असते.
अजगर पकडतेवेळी वल्ड फॉर नेचर संस्थेचे जिल्ह्याध्यक्ष प्रथमेश पवार, तुषार गमरे, विकास पवार, श्रुतीक कदम, संदीप गमरे, आम्रपाली गमरे, प्रशिका गमरे आदी उपस्थित होते. या अजगरास निसर्गात मुक्त करताना सर्पमित्र प्रथमेश पवार, तुषार गमरे, श्रुतीक कदम, प्रसन्न खेडेकर, योगेश मोहिते आदी उपस्थित होते.