(रत्नागिरी)
पैसाफंड इंग्लिश स्कूल, संगमेश्वर दहावी १९९० – ९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच मालगुंड, तीर्थक्षेत्र गणपतीपुळे, (जि.रत्नागिरी) येथे पर्यटनस्थळी निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम मित्रमेळा संयोजक कमिटी आणि सगळ्या वर्ग मित्र-मैत्रिणींचा प्रचंड उत्साह आणि साथ यामुळे हे स्नेहसंमेलन उत्साहात झाले.
जवळपास तीन दशकानंतर मित्रमेळा भरविण्यास प्रारंभ झाला, ज्यावेळी जलद प्रसारमाध्यमे नव्हती; दहावीनंतर पुढील शिक्षणाकरिता विविध ठिकाणी गावी, शहर, परगावी विखुरले होते. त्यांना एकत्र आणण्याचे श्रेय व्हॉट्स ॲप ग्रुप ॲडमिन आणि सहकारी मित्रवर्ग यांनी केले. अर्धशतकाकडे असतानाही शालेय जीवनाची अनुभूती यावेळी सर्वाना घेता आली.
मित्रमेळाच्या औचित्याने अनेक खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या, यासाठी विशेष म्हणजे संयोजक कमिटीने सर्व सहभागा करीता चार गट बनविले. त्यास पक्षीप्राण्यांच्या टोपणनावाने बारसे केले ते मजेशीर होते. यातून मित्रमैत्रिणी ची एकसंघ भावना दिसून आली. डोळ्यावर पट्टी बांधून फलकावर गाढवाला शेपूट लावणे यातही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद , (वर्गमित्राची) स्पर्धकाची खिल्ली उडवण्याचे या वयातही सोडले नाही. एक पेन डाइस गेममध्ये सुद्धा पेन मिळवण्यासाठी उत्साह खूपच सुंदर होता. त्यासोबत महिला वर्गासाठी पैठणी पटकवण्यासाठी अतिशय बुध्दीचातुर्य वापरून उत्तम गेम खेळवले गेले. प्रत्येकाच्या आवडीनुसार अनेक मेनूसह मेजवानीचा बेत आखला होता. आपला एक वर्गमित्र वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असल्याने, यांनी आरोग्य तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी उत्तम सल्ले दिलेच. सोबत औषधांचे वाटपही केले तो आनंद निराळाच होता.
पैसाफंड शाळेचा विद्यार्थी नाव हा एकच आविर्भाव प्रत्येकात दिसून आला. प्रत्यक्ष सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकाच रंगाचा टीशर्ट (गणवेश ) परिधान केल्याने याची प्रचिती आली. विविध क्षेत्रात कार्यरत असूनदेखील नव्याने मित्रमेळाच्या निमित्ताने विद्यार्थी दशेत गेले. चक्क आपल्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या. शाळेची इमारत, पटांगण ,वर्ग,फळा, बाकावर आपण सर्व, गुरुवर्य शिक्षकवर्ग, शिपाईमामा, घंटा, ऑफिस स्टाफ, ग्रंथालय, प्रयोगशाळा, रंगमंच, वडापावची खासियत हे चित्र उभे राहिले. तेव्हासारखीच मौजमस्ती, थट्टामस्करीने हास्यकल्लोळ मध्ये बुडून गेले होते. या मेळ्यासाठी अजूनही काही मित्र मैत्रिणींना यायची ईच्छा होती पण काही कारणास्तव अडचणीमुळे शक्य झाले नाही, त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली असे मित्र मैत्रिणीनी बोलून दाखवले. खेळीमेळीच्या वातावरणात स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले.