(नवी दिल्ली)
सीआरपीएफच्या जवानांवर जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पुलवामातील सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणे आणि कट रचल्याबद्दल कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. या पाच दहशतवाद्यांमध्ये सज्जाद अहमद खान याच्या नावाचाही समावेश आहे. त्याने पुलवामाच्या हल्ल्यादरम्यान सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत माहिती दिली होती.
कोर्टाने या पाच दहशतवाद्यांना देशभरात केलेल्या दहशतवादी कारवाया आणि यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सज्जाद खान, बिलाल मीर, मुजफ्फर भट, इशफाक भट आणि मेहराजुद्दीन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.