( खेड / इक्बाल जमादार )
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने खेड – दापोली – मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष व महिला गट निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – 2023 दिनांक १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत पुरुष गटात युवा फलटण मुंबई उपनगर यांनी विजेतेपद मिळविले असून उपविजेतेपदावर भारत पेट्रोलियम मुंबई यांना समाधान मानावे लागले आहे. तसेच महिला गटात डॉ. शिरोडकर स्पोर्टस मुंबई शहर यांनी विजेतेपद तर अनिकेत स्पोर्टस क्लब भरणे- रत्नागिरी यांनी उपविजेतेपद मिळवले आहे.
पुरुष गटात ठाणे महानगरपालिका यांनी तृतीय तर महिंद्रा अँड महिंद्रा यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. तर याच पुरुष गटातील उत्कृष्ट चढाईचा मान महिंद्रा अँड महिंद्रा संघाच्या सौरभ कुलकर्णी तर उत्कृष्ट पकडीचा मान भारत पेट्रोलियम संघाच्या गिरीश एरनाक यांना तर युवा फलटण मुंबई उपनगरचा खेळाडू हर्षवर्धन हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. तसेच महिला गटात मुंबई उपनगर येथील महात्मा गांधी स्पोर्टस क्लबने तृतीय तर द्रोणा स्पोर्टस क्लब पुणे यानी चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. तर याच महिला गटातील उत्कृष्ट चढाईचा मान भरणेतील अनिकेत स्पोर्टस क्लबच्या सिद्धी चाळके तर उत्कृष्ट पकडीचा मान द्रोणा स्पोर्टस क्लब पुणेच्या आचल पवार याना तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबच्या मेघा कदम हिला मिळाला आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि्. प. सदस्य अरुण कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, माजी नगरसेवक संजय मोदी, राजेश बुटाला, स्वप्निल सैतवडेकर, मिनार चिखले, पराग चिखले, सिद्धेश खेडेकर आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.