(मुंबई)
राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. यात विधानसभा अध्यक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. मागील एक महिन्यापासून या नाट्यमय घडामोडी घडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची यावर एकही प्रतिक्रिया आलेली नव्हती.
मात्र उद्या बुधवारी (13 जुलै) रोजी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे पाहयला मिळणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बुधवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते राज्यातील घडलेले सत्तांतर, एकनाथ शिंदें गटानी केलेले बंड, शिवसेनेला लागलेली गळती, आदी विषयावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तसेच महाविकास आघाडी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर टिकास्त्र सोडणार का, याची उत्सुकता मनसैनिकांना लागली आहे. त्यामुळं बुधवारी राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.