(रत्नागिरी)
केंद्र शासनाच्या पी. एम. किसान सन्मान निधी या योजनेतंर्गत अनेक शेतकरी यांनी ऑनलाईन पध्दतीने आपली नोंदणी करुन वार्षीक ६०००/- रु प्राप्त करीत आहेत. तथापि या योजनेच्या लाभार्थी यांना थेट त्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा होत असल्याने लाभार्थी यांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे, त्याशिवाय लाभार्थी यांना या योजनेचा १३ वा हफ्ता मिळणार नाही.
तब्बल ६०७७ इतक्या लाभार्थी यांची बँक खाती आधार लिंक नसल्याचे कळविण्यात आलले आहे. या लाभार्थी यांनी पी. एम. किसान योजनेसाठी दिलेल्या आपले बँक खाते आधार लिंक करण्यासाठी तात्काळ आपले बँक खाते असलेल्या शाखेत जाऊन आधार लिंक करुन घ्यावे. ज्या लाभार्थी यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत त्या लाभार्थीची गावनिहाय यादी आपल्या गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना देण्यात आली आहे.