(मुंबई)
ईपीएफओ सदस्यांसाठी सरकारने नवीन ई-पासबुक लाँच केले आहे. हे ई-पासबुक पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर आहे आणि सदस्यांच्या ईपीएफ खात्याबद्दल अधिक तपशीलवार माहिती प्रदान करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला.
पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याची माहिती ई-पासबुकद्वारे (ई-ईपीएफ) घरी बसून मिळू शकते. मंगळवारी या ई-पासबुकची घोषणा करताना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याचा ग्राफिक्स डेटा सहज तपासता येणार आहे. यासाठी त्यांना ईपीएफओच्या शाखेत जावे लागणार नाही.
ई-पासबुक तपासण्याची प्रक्रिया
– ईपीएफ ई-पासबुक तपासण्यासाठी तुम्ही epfindia.gov.in वर लॉग इन करा.
– यानंतर तुम्ही तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.
– ई-पासबुकवर क्लिक करा.
– तुम्हाला मागितलेली उर्वरित माहिती टाकावी लागेल आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
– यानंतर तुमचा सदस्य आयडी उघडा.
– तुम्ही काही मिनिटांत तुमच्या EPF खात्यातील शिल्लक तपासण्यास सक्षम असाल.