(संगमेश्वर)
पिरंदवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन 2022-27 या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी बिनविरोध पार पडून संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज शुक्रवारी दि. 22 एप्रिल रोजी पिरंदवणे येथील संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.
या कामी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश गमरे यांनी चांगले सहकार्य करून एकंदर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली. अध्यक्षपदी श्री. मिथुन मनोहर निकम तर उपाध्यक्षपदी सौ. स्वाती अरविंद मुळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या सचिवांनी अभिनंदन केले व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आभार मानून निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याचे जाहीर केले.