(रत्नागिरी/प्रतिनिधी)
तालुक्यातील पावस येथील एका तरुणाचे शेजारच्या तरुणीशी प्रेम जुळले होते. आपल्या प्रेम प्रकरणाला घरातून विरोध होईल या भीतीने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही पळून गेले. मात्र इकडे मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या घरच्यानी पूर्णगड पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मुलीची संपूर्ण माहिती घेतली असता पळून गेलेल्या मुलासंदर्भात माहिती मिळाली. पोलिसांनी त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्या दोघांचे मोबाईल नंबर ट्रेस करण्यात आले. त्यावरुन ती दोघं कल्याण-मनपाडा परिसरात रहात असल्याचे समजले. पोलिसांनी मुंबईत जावून खात्री केली आणि मनपाडा येथून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.