(रत्नागिरी)
पालीतील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रुंदीकरण करण्यात आलेल्या मातीच्या भरावाच्या भागावर चौपदरीकरणातील कंत्राटदाराने खडीकरण व गटारे बांधकाम अद्यापही केलेले नसल्याने येथे पाणी मारल्याने चिखल साठून त्यावरुन दुचाकी घसरून अपघाताची शक्यता आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी येथे दोन ठिकाणी केलेले कच्चे वळण रस्तेही सध्या खड्डेमय झालेले असून ते आणखी धोकादायक होऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याने येथील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण तातडीने करण्याची गरज आहे.
पालीतील काही ठिकाणी गटारांची बांधकामे तातडीने करण्याची गरज आहे. तसेच गतवर्षी उड्डान पुलाच्या खाबांचे काम अपूर्ण ठेवून कच्चा फक्त खडीकरण करुन सेवा रस्ता केलेला आहे तो ही आता खड्डेमय झाल्याने तेथेही डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण रस्ता करण्याची गरज आहे. पाली बाजारपेठेमध्ये चौपदरीकरणाच्या सपाटीकरणातील अर्धवट सेवा रस्त्यांचे व गटाराच्या अपूर्ण कामांमुळे मातीचा चिखल होऊन महामार्गावर माती येऊन अपघात घडण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष देऊन कामे पूर्ण करून घेण्याची मागणी होत आहे.