(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील डि.जे.सामंत इंग्लिश मिडियम स्कूल पाली येथील मुख्याध्यापिका सौ. नुतन नितीन कांबळे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण जळगाव येथील राज्य अधिवेशनामध्ये होणार आहे.
सौ.नुतन नितीन कांबळे या डी.जे सामंत इंग्लिश मिडियम पाली येथे गेली १२ वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी मुख्याध्यापक म्हणून केलेले काम अतिशय प्रशंसनीय आणि उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. शैक्षणिक सामाजिक कामात सौ. नुतन नितीन कांबळे यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.सौ. नुतन नितीन कांबळे यांच्या त्यागी आणि उपक्रमशील कार्याची दखल घेऊन त्याला राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ.नुतन कांबळे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे उद्योग मंत्री ,तसेच संस्थेचे संस्थापक उदय सामंत, संस्थेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा सामंत, सर्व संचालक,शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, मित्र मंडळ,यांच्याकडून सौ. नुतन कांबळे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सदरचा पुरस्कार जळगाव येथील १८नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या राज्य अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यप्रवण असलेल्या राज्यातील मुख्याध्यापकांना यावेळी गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत.सदरचे राज्य अधिवेशन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघाचे अभ्यासू आणि धडाडीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.