(मुंबई / निलेश कोकमकर)
सध्या राज्यात ओबीसी जनगणना आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आणि त्यावर निर्माण झालेल्या समस्या आणि काही प्रश्न यावर तोडगा काढण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण ओबीसी मंत्री श्री अतुलजी सावे यांच्याबरोबर कुणबी समाज प्रतिनिधींची तातडीची मीटिंग बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी 9.00 वा. मंत्रालय समोर, शिवगड बंगला येथे आयोजित केली होती.
त्यावेळी श्री. चंद्रकांत बावकर, श्री अरविंद डाफळे, श्री. माधव कांबळे तसेच रत्नागिरीहून खास या कामासाठी साठी आलेले कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. रामभाऊ गराटे, सरचिटणीस श्री. शिगवण व उपाध्यक्ष श्री मांडवकर हे उपस्थित होते. कोकणातील कुणबी (तिलोरी) कुणबी समाजाचा जात पडताळणी संदर्भात होणाऱ्या समस्या व निर्माण झालेला आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. शासन लवकरच आपले निर्णय जाहीर करील असे आश्वासन दोन्ही मंत्री महोदयांनी दिले आहे.