( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळुण, रत्नागिरीतील 7 सायकल पटूनी 40 तासांत पाटण ते हुबळी (कर्नाटक) व परत पाटण असा तब्बल 600 किमीचा सायकल प्रवास पूर्ण करत चिपळूणचे नाव रोशन केले आहे. या 7 वीराना सायकलिंग क्षेत्रातील मानाचा सुपर सुपर रँडोनिअर्स किताबाने गौरवण्यात आले आहे.
चिपळुणातील सह्याद्री सुपर रँडोनिअर्सचे मनोज भाटवडेकर, श्रीनिवास गोखले यांच्या पुढाकाराने शनिवार 17 डिसेंबर रोजी पाटणपासून हुबळीपर्यंत 600 किमी सायकल बीआरएमचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 10 सायकलपटूंनी भाग घेत ती पूर्ण केली. या 10 पैकी 7जणांनी याआधी 200, 300 आणि 400 किमी बीआरएम पूर्ण केलेल्या होत्या. त्यामुळे 600 किमीची बीआरएम पूर्ण केल्यानंतर त्यांना सुपर रँडोनिअर्स किताब मिळाला आहे.
डॉ. समुद्रविजय पाटील, अहमद शेख, योगेश ओसवाल, तर रत्नागिरी तालुक्यातील अमित कवितके, त्रुणाल येरुणकर, डॉ. अनिकेत सनगर, डॉ. यतीन धुरत याना हा किताब मिळाला आहे.