(देवरुख)
रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सावरकर चौक ते पाटगाव या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रहदारी व वाहतूक होत असून संबंधित विभागाचे अधिकारी मार्गाने मुख्यालयातील कामकाजासाठी जात येत आहेत. परंतु जि. प.बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने पुलावरील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पुल धोकादायक बनला आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन पुलाची पाहणी करावी तसेच त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, याबाबत संबंधित विभागाला व वरिष्ठ अधिकारी यांना पत्र व्यवहार करणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते, माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे व महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरी चे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.