[ रत्नागिरी /तालुका प्रतिनिधी ]
संगमेश्वर येथे भवानी हॉटेल मध्ये कामाला असलेल्या कोल्हापूर येथील तरुणाने हॉटेल मालकांकडुन 2016-17 साली रु .४४,००० / – घेतले होते. घरी महत्वाचे काम आहे असे सांगुन तो निघुन गेला होता. पैसे परत देण्यासाठी वारंवार मागणी केल्यावरही त्याने उध्दट वर्तन करत असे. ०४ जानेवारी २०१७ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात पोलिस स्थानकात त्याच्यावर भादविकलम ४२० , ५०६ ( २ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता.
या गुन्ह्याचा तपासात पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसही मार्गदर्शन करुन सदर आरोपींना पकडण्याची मोहिम दिली होती. या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गोपनिय बातमीदारांकडुन अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार कोल्हापुर हा बोलोली , ता . करवीर , जि . कोल्हापुर येथे असल्याचे समजले. त्यानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही पुर्ण करुन , आरोपीस बोलोली येथुन ताब्यात घेण्यात आले आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात देण्यात आले. रविंद्र शिवाजी पाटील (रा . तामगांव , ता . करवीर , जि . कोल्हापुर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली .
सदरची कामगिरी सपोफौ . प्रशांत बोरकर , पोहवा . शांताराम झोरे , नितीन डोमणे , अरुण चाळके , राजेश आखाडे यांनी केली आहे .