(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील मौजे पाचांबे (नेरदवाडी) येथील ग्रामस्थ नेरदवाडी रस्ता डांबरीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी करत होते. रस्त्याची अत्यंत दुरवस्था होऊनही डांबरीकरणासाठी लोकप्रतिनिधी वारंवार दुर्लक्ष करत होते.
आमदार शेखर निकम यांनी पुढाकार या रस्त्यासाठी निधी दिला. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून आमदार निकम यांनी डांबरीकरणासाठी बजेटअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला व गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करून दिले. याबद्दल ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे आभार व्यक्त केले आहेत.