(पाचल / तुषार पाचलकर)
पाचल बाजारपेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भिंगार्डे कॉम्प्लेक्स मधील रूममध्ये आज अचानक आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्त असे की राजेंद्र मनोहर नार्वेकर यांच्या मालकीचा रूम पाचल बाजारपेठेतील भिंगार्डे कॉम्प्लेक्स येथे दुसऱ्या मजल्यावर आहे. एस टी महामंडळात लांजा डेपोला वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असलेलं नार्वेकर यांचे पाचल पासून जवळच असलेलं गावं मिळंद त्यामुळे ते या रूम वर साफसफाईसाठी व आरामासाठी केंव्हा तरी येतात, त्यामुळे हा रूम बंद स्वरूपात असतो. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या रूममधून धूर येताना दिसला असता आजबाजूच्या लोकांनी आरडा ओरडा केला. त्यामुळे पाचल बाजारपेठेतील लोकं सदर ठिकाणी जमा झाली.
सदर घटनेची माहिती रायपाटण पोलीस स्टेशनंला कळवताच रायपाटण पोलीस दूरक्षेत्र चे ठाणे अंमलदार श्री कमलाकर पाटील, पो. कॉ.निलेश कात्रे, पो.कॉ.भिम कोळी तात्काळ घटना ठिकाणी पोचले होते. तितक्यात जमा झालेल्या तिथल्याच जमावाने दरवाज्याचे लॉक तोडून आतील परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, आग लागलेल्या रूम मध्ये फ्रिज, कपाट, पुस्तके, कपडे व इतर मौल्यवान सामानाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अजून काही काळ जर आग पेटत राहिली असती तर आत भरलेला गॅस सिलेंडर ला आग लागून खूप मोठा स्पोट झाला असता. परंतू परिसरातील तरुणांच्या धाडसा मूळे मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जातं आहे. एकंदरीत परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सदर आग ही फ्रीज मध्ये असलेक्या वायर वर पाणी पडळ्यामुळे शॉर्ट सर्किट झाले असावं असा तर्क काढला जात होता.
सदर घटनेत आग आटोक्यात आणण्यासाठी आपला जीव मुठीत धरून मोठं धाडस दाखणारे,अक्षय आमकार, संतोष काजारे, मंगेश नारकर, मनोज चव्हाण, प्रकाश गजापकर, प्रतीक शिंदे, प्रवीण मांजरेकर, मुकुंदा पवार, रोहित धायगुडे, रवी नारकर, सुनील चव्हाण, बळीराम पाटेकर, यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.