पिवळे दात केवळ तुमच्या सौंदर्यातच बाधा निर्माण करत नाही तर दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांनाही आमंत्रण देऊ शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि तोंडाची स्वच्छता न ठेवल्यामुळे दातांवर पिवळी घाण साचते, यालाच टार्टर म्हणतात. वास्तविक हा पिवळा थर पांढऱ्या दातांना पिवळे बनवण्याचे काम करतो. टार्टर वेळीच दूर केले नाही तर ते दात आणि हिरड्यांच्या मुळांमध्ये शिरते, त्यामुळे दात आणि हिरड्या कमकुवत होतात. नंतर या समस्येमुळे पायरिया, दातांत पोकळी निर्माण होणे, दातांमधून रक्त येणे, हिरड्या दुखणे इत्यादी त्रास सुरु होतात.
वयानुसार आपले दात पिवळे होऊ लागतात. याशिवाय दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत, जसे की दात स्वच्छ न करणे, धूम्रपान आणि चहा-कॉफी सारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे अतिसेवन. दातांचे आरोग्य राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात सुंदर आणि पांढरे करण्यासाठी वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे असाही सल्ला दिला जातो.
बेकिंग सोडा
दात स्वच्छ करण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. ही पेस्ट दातांवर काही वेळ लावून ठेवा आणि नंतर धुवा. बेकिंग सोडा दातांचा पिवळेपणा दूर करेल. अमेरिकन डेंटल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की बेकिंग सोडा दात सुरक्षितपणे पांढरे करतो. इतकेच नाही तर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी आणि दातांचे पिवळे पडणे कमी करण्यातही हे गुणकारी आहे.
मीठ
घरातील मीठ सोबत थोडे कडू तेल घ्यायचे आहे. या दोन्ही गोष्टी दात स्वच्छ तर करतीलच पण बॅक्टेरियाही दूर करतील. कडू तेलाच्या काही थेंबांमध्ये चिमूटभर मीठ टाकून दातांसह हिरड्यांना मसाज करा. दररोज सुमारे 3 ते 5 मिनिटे हे करा.
हळद
रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने हळद पावडर दातांवर लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
सफरचंद व्हिनेगर
सफरचंद सायडर व्हिनेगर दात स्वच्छ करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सिचुआन युनिव्हर्सिटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की सफरचंद सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लीचिंग प्रभाव पडतो.सफरचंद सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी, सुमारे २०० मिली पाण्यात २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. हे माऊथवॉश ३० सेकंद तोंडात ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा हा माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका.
फळे आणि भाज्या
फळे आणि भाज्यांचे सेवन केवळ तुमच्या चांगल्या आरोग्यासाठीच नाही तर ते तुमच्या दातांसाठीही महत्त्वाचे आहे. फळे आणि भाज्या खाल्ल्याने दातांवरील प्लेक दूर होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी आणि अननस ही दोन अशी फळे आहेत जी तुमचे दात पांढरे करतात. स्ट्रॉबेरी दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, कारण त्यात बरेच फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स आहेत. यामुळे दात पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.
तुळस
तुळशीची पाने वाळवा, त्यांची पावडर बनवा आणि दात घासण्यासाठी वापरा. तुळशीची हिरवी पाने दात मजबूत करतात आणि दातांचा पांढरेपणा वाढवतात. पायरिया (हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे) या दातांच्या समस्यांवरही तुळशीचा उपयोग होतो.
केळीची साल
केळ्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते. या गोष्टींचा उपयोग ब्लिचिंग एजंट म्हणून करण्यात येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही केळ खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता ती साल तुम्ही तुमच्या दातांना घासली तर तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत होईल. तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनवेळा करु शकता.
संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीचा वापर केल्याने दात स्वच्छ होण्यास मदत होते. ह्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा आतला भाग तुमच्या दातांवर चांगल्या प्रकारे घासून घ्या, असे केल्याने तुमच्या दातांचा पिवळसर रंग, दातांवरचे डाग दूर होण्यास मदत होईल. संत्र्याची साल सुकवून घ्या आणि ती बारीक करा आणि त्याने ब्रश करा. तुम्हाला त्याचा परिणाम काही दिवसात दिसू लागेल आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दात चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी ही पद्धत नियमितपणे सुध्दा वापरू शकता.
खोबरेल तेल
पिवळे दात पांढरे करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय करा दात स्वच्छ करण्यासाठी खोबरेल तेल हा एक पारंपारिक भारतीय उपाय आहे. तोंडाची स्वच्छता करण्यासाठी आणि शरीरातून विष काढून टाकण्यासाठी हा उपाय केला जातो. बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी तोंडात तेल घेऊन ते तोंडभर फिरवा. जे प्लेकमध्ये बदलू शकते आणि आपले पिवळे दात पांढरे दिसू लागतात.
पारंपारिकपणे, तोंड स्वच्छ करण्यासाठी सूर्यफूल तेल किंवा तिळाचे तेल वापरले जाते परंतु कोणतेही तेल चालेल. खोबरेल तेल हा एक लोकप्रिय उपाय आहे. खोबरेल तेलात लॉरिक ॲसिडचे प्रमाणही जास्त असते, ज्यात जळजळ कमी करण्याची आणि जीवाणूंना मारण्याची क्षमता असते. दररोज तेल तोंडात ओढल्याने पट्टिका आणि हिरड्यांना आलेली सूज आणि तोंडातील किटाणू कमी होतात. स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स हा तोंडातील जीवाणूंच्या प्राथमिक प्रकारांपैकी एक आहे ज्यामुळे प्लाक आणि हिरड्यांना सूज येते. तिळाच्या तेलासह दररोज स्वाशिंग केल्याने लाळेतील स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स कमीतकमी 1 आठवड्यात कमी होतात.
लिंबू
लिंबाचा वापर करून तुम्ही अनेक प्रकारे दात स्वच्छ पांढरे करु शकता, तुम्ही दातांवर लिंबू घासा आणि काही खाल्यानंतर हा उपाय नक्की करून बघा. दातांच्या पिवळेपणाच्या समस्येपासून सुटका होते. ह्याव्यतिरिक्त, तुम्ही पाण्यात मिसळलेल्या लिंबाचा रस घेऊन देखील तोंड स्वच्छ धुवू शकता आणि जर तुम्ही लिंबाच्या रसामध्ये थोडे पाणी टाकून रात्रभर ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर दातांवर लावलं तर जास्त फायदा होतो. आपण हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. दातांचा पिवळेपणा गायब होऊ लागेल. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. आपल्या दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. तसेच लिंबाच्या सालीची पावडर तयार करा आणि दातांवर लावा. यामुळे देखील दातांचा पिवळेपणा दूर होईल.
कडूनिंब
कडुनिंबाच्या फांद्या आजही अनेक भारतीय टूथब्रश म्हणून वापरतात. कडुलिंबाच्या तेलामध्ये तोंड व श्वासातून येणारा दुर्गंध रोखण्यासाठी, दातांवर साचलेले सूक्ष्मजीव किंवा डोळ्यांना न दिसणारे सुक्ष्म बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि दात किडणे व पोकळी निर्माण होणे यांसारख्या समस्यांशी लढण्यासाठी तुरट आणि अँटीसॅप्टिक गुणधर्म असतात. म्हणूनच कडूनिंबाने दात घासावेत.
मसाले
स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांचा वापर करूनही पिवळया दातांच्या त्रासातून बरे होऊ शकता. ह्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलात मीठ मिसळून ब्रश करा दाताचा पिवळा रंग जाईल. ह्याव्यतिरिक्त, जर तुम्ही तमालपत्र चांगले बारीक केले आणि त्याने दर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी बोटाने ब्रश केले तर तुम्ही पिवळया दातांच्यात्रासातून बरे होऊ शकता. तसच हळद, मोहरीचे तेल आणि मीठाने ब्रश करा त्यामुळे दात मजबूत होतील आणि दातांचा पिवळेपणा निघून जायला लागेल.
दात पिवळसर होण्याची अनेक कारणे असू शकतात.
काही पेये, वाईन, कॉफी किंवा चहा जास्त पिणे.
सॉस जास्त खाणे.
जास्त गोड आणि चॉकलेट खाणे
धूम्रपान किंवा तंबाखू चघळणे
काही औषधे आणि माऊथवॉशचे दुष्परिणाम
वय जास्त असेल तरीहि दात पिवळे पडू शकतात.
आनुवंशिकता
तोंडात काही जखम झाली असेल तर
जास्त फ्लोराईडचा वापर करत असाल तर
दातांची काळजी आणि तोंडाची स्वच्छता करत नसाल तर.
तोंड कोरडे पडणे किंवा लाळेचा अभाव असेल तर दात पिवळे पडू शकतात.