चिपळूण : पवार आणि निकम कुटुंबियातील दोन पिढ्यांची वीण आजही घट्ट असून, आज निकमांची तिसरी पिढीही सकीय झाल्याचे पाहून आज आपल्याला खूप आनंद झाला आहे. आता या दोन कुटुंबियांतील हीच वीण तिसऱ्या पिढीने जपायची आहे. ती तुम्ही जपाल, हे उद्गार आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांचे. आमदार शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी श्री. पवार यांची भेट घेतली असता श्री. पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनिरुद्ध निकम यांनी कृषी विषयात बीएसस्सी झाले आहेत. कोकणातील वेगवेगळ्या जातीच्या आंबा फळावर प्रक्रिया करीत आहेत. आंब्यावर प्रक्रिया करून ती भेट देण्यासाठी ते स्वत पवार यांच्या भेटीला गेले होते. यावेळी कोकणातील वेगवेगळ्या आंब्याची स्वत तयार केलेली खास भेट त्याना दिली. निकम यांचे सुपुत्र आपल्या भेटीला आल्याचे समजताच तत्काळ, अनिरुद्धला आत बोलावा, आज मला छान वाटले. तिसरी पिढी सक्रिय झाल्याचे बघून मला समाधान वाटले’ असे म्हणत पवार यांनी अनिरूद्धची विचारपूस सुरू केली. पवार यांनी अनिरुद्धकडून आंबा पकियेबाबतची पुरेपूर माहिती घेतली. अजून काय काय करता येऊ शकते हे जाणून घेतले.
अनिरुद्ध निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर, पवार यांनीही अनिरुद्ध याचे कौतुक केले. अजित पवार यांनी खुश होत त्याला प्रेमाने जवळ घेतले. शिवाय ऑस्ट्रेलिया जाण्यापूर्वी मला भेटून जा असेही सांगितले.