पवारांचे साखर कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत, ऑक्सिजन हा विषय डॉक्टर आणि त्या क्षेत्रातील उद्योगांचा : निलेश राणे यांची खरमरीत टीका
ऑक्सिजन या विषयावर काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील.
तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण तुम्ही सोडणार नाही.
अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयंकर असताना कोरोना रुग्णांना ऑक्सिजन तुटवड्याला सामोर जावं लागतं आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने बऱ्याच रुग्णांचे मृत्यू देखील झाले आहेत. कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना राज्य सरकार रुग्णांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे.राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून ठाकरे सरकारमधील मंत्री घरात बसून बोलबच्चन करत बसले आहेत.
अश्या हलगर्जीपणामुळे राज्याचं वाटोळं लागलं आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी खडेबोल सुनावले आहे.
ते म्हणाले की, आगोदर सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली सारख कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील असे त्यांनी सांगितले.