(नाशिक /प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे 2025 सालापर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी यंदाही सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत यंदाच्या वर्षी 25 लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती सेवामार्गाच्या बालसंस्कार, युवाप्रबोधन व देश-विदेश अभियानचे प्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांनी दिली.
श्री. मोरे म्हणाले की, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र, पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा र्हास या बाबी गंभीर असून पर्यावरणाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाने 2025 सालापर्यंत सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान हाती घेतले आहे.
या अभियानाची सुरुवात 2022 सालापासून करण्यात आली. गतवर्षी कमी अवधीमध्ये संपूर्ण राज्यभरात अकरा लाख वृक्षांचे यशस्वी रोपण करण्यात आले. या अभियानात सेवामार्गाची सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रे आणि कोट्यवधी सेवेकरी परिवार जोडला गेला आहे. केवळ वृक्षारोपण करुन थांबण्याऐवजी वृक्षांच्या संगोपनालाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा, मोकळ्या जागा, खासगी-वैयक्तिक जागांमध्ये वृक्षारोपण केले जाते. विशेष म्हणजे ङ्गघनवनफ पद्धतीने वृक्षांची लागवड केली जाते. घनवन पद्धतीनुसार एक मीटर बाय एक मीटर जागेत तीन झाडे त्रिकोणी पद्धतीने लावली जातात. त्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची लागवड होते. शिवाय झाडांखाली गवतही उगवत नाही. त्यामुळे वणव्यामध्ये झाडे जळून जाण्याची भीती नसते अशी सविस्तर माहिती श्री. मोरे यांनी दिली
ग्रामपंचायतींचे योगदान
गेल्यावर्षी संपूर्ण राज्यभरात सेवेकर्यांनी हे अभियान राबविले तेव्हा गावा-गावातील स्थानिक जनतेचा आणि ग्रामपंचायतींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षारोपणात सेवेकर्यांसह समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेतलाच शिवाय काही ग्रामपंचायतींनी वृक्ष संवर्धनासाठी जाळ्या बसविण्यासाठी पुढाकार घेतला. अशाच पद्धतीने यंदाच्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात हे अभियान राबविले जाणार आहे. परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या संकल्पनेनुसार महावृक्षारोपण अभियान राबविले जात आहे असे श्री. मोरे यांनी नमूद केले.
सीडबॉल अन् गणेशमूर्ती
सीडबॉल या स्वतंत्र उपक्रमाविषयी श्री मोरे म्हणाले की, पावसाळ्यात महावृक्षारोपणा बरोबरच सीडबॉलचाही उपक्रम राबविला जातो. यंदा बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या हजारो सेवेकर्यांनी लाखोंच्या संख्येने सीडबॉल तयार केले आहेत. ही मुले वर्षभरात फळांच्या बिया घरी गोळा करुन ठेवतात आणि मे महिन्यात सीडबॉल तयार करतात.
पावसाळा सुरु झाला की, माळरान, डोंगरभाग, मोकळ्या मैदानात सीडबॉल टाकतात. कालांतराने बी रुजून रोप उगवते. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा 1 जुलै रोजी सीडबॉल पूजन सोहळा डहीशश र्र्ॠीीीशिशींह या युट्यूब चॅनलवरुन थेट प्रक्षेपित होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. सेवामार्गातर्फे माती आणि शेणापासून तयार करण्यात येणार्या गणेशमूर्तींचे कुंडीत विसर्जित करुन बीज जमिनीत रुजवायचा संस्कार मुलांवर केला जातो अशी संपूर्ण संकल्पना श्री नितीनभाऊ मोरे यांनी स्पष्ट केली.