(रत्नागिरी)
कोरोनानंतर आलेल्या कर्ज अर्थकारणात मदत व्हावी म्हणून पथविक्रेत्यांना कर्ज देण्यासाठी आखलेल्या योजनेतील कर्ज आता 50 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये त्याची परतफेड केल्यानंतर 20 हजार रुपये व नव्याने त्यात वाढ करण्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.
पंतप्रधान स्वनिधी योजनेस सरकारकडून सात टक्के व्याज दरात सवलत दिली जाते. त्यामुळे या योजनेतून कर्ज घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत. आतापर्यंत 22 लाख 69 हजार 477 जणांना या योजनेचा लाभ झाला आहे. कोरोनाकाळात हातावर पोट असणार्या पथविक्रेत्यांचे मोठे हाल झाले. पण याच काळात पथविक्रेत्यांचे सर्वेक्षणही करण्यात आले व त्यांच्यासाठी कर्ज योजनाही सुरू करण्यात आली.
सन 2020-21 मध्ये 20 लाख 57 हजार तर 2021-22 मध्ये आठ लाख 12 हजार 418 लाभार्थी होते. आतापर्यंत सरकारने सवलती पोटी 39 कोटी 33 लाख 50 हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे.