(राजापूर)
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची राजापूर पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात झाला होता. त्यामध्ये वारीशे गंभीर जखमी झाले होते.
कोल्हापूर – येथे उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित चालक – पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला आजपर्यंत – पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने संशयिताला राजापूर दिवाणी न्यायालयात हजर केले.