(मुंबई / प्रतिनिधी)
बोरवली मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहिसर शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रमुख मार्गदर्शक, सल्लागार रविंद्र दादू गावडे यांचे शुक्रवारी ( दि.२७ )रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. एक लढवय्या व निष्कलंक चारित्र्य चातुर्य व दानशूर व्यक्तीमत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोककळा पसरली. सामाजिक क्षेत्रातही धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी अस्मिता आणि कन्या हिमानी, भाऊ पत्रकार किशोर गावडे व बहिण मिनाक्षी साळवी, नाडणकर, सावंत, ठाकूर, गांवकर, बागवे, नागवेकर असा मोठा परिवार आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मीरा रोड येथील वाॅक्हरट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उपचार सुरु असताना त्यांचे झोपेतच निधन झाले. बोरवली पूर्व येथील दहिसर शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्था ,विद्या भूषण स्कूल जवळ रावळपाडा, येथे त्यांचे वास्तव्य होते .
दौलत नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शनिवारी शोकाकुल वातावरणात कन्या हिमानी हिने मुखाग्नी दिला. त्यांच्या पार्थिवाच्या अखेरच्या दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. पत्रकार किशोर गावडे यांचा शनिवारी वाढदिवस सर्वानी साजरा करायचे निश्चित करण्यात आले असताना, त्याच दिवशी मोठ्या भावाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागला.