(मनोरंजन)
एकीकडे शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ सिनेमाला प्रचंड विरोध असल्याचं दिसत आहे. अनेकांकडून या सिनेमावर आक्षेप देखील घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून प्रदर्शनापूर्वीच काही तरुणांनी संपूर्ण थिएटर बुक केल्याची माहिती समोर आली आहे.
अवघ्या दोन दिवसाने रिलीज होणाऱ्या ‘पठाण’ सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग प्रेक्षकांनी केलं असून तिकिटांची विक्री जोरदार सुरू आहे. प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शाहरुख देखील भावूक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ‘पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. सांगलीमधील एसआरके फॅनक्लबने ट्विटरद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबरच सांगलीतील तरुणांनी थिएटरचं बुक केलं असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे सांगलीच्या या तरुणाला शाहरुखने ट्विटरद्वारे उत्तर दिलं आहे. शाहरुख म्हणाला, “धन्यवाद आणि आशा करतो की तुम्हाला हा चित्रपट आवडेल.”
सांगलीच्या तरुणांनी संपूर्ण थिएटर बुक केल्यानंतर आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता अमरावतीमधील एसआरके फॅनक्लबने ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या या तरुणांनी देखील थिएटर बुक करतानाचा व्हिडीओ शेअर केले आहे. येत्या २५ जानेवारील बहुचर्चित ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. हा सिनेमा हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.