देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. यात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय कार्यक्रमाची योजना अंमलात आणली जात आहे. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी दूर करून त्यांना मदत करावी असे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
संगमेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून मोदी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना स्वखर्चाने फळवाटप केले. यामाध्यमातून सर्व रुग्णांचे आरोग्य लवकरात लवकर सुधारावे अशी मनोकामना सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमासाठी श्री. अनिल घोसाळकर, श्री. दीपक वेल्हाळ, श्री. अजिंक्य राज सुर्वे, श्री. दीपक कांबळे, श्री. गणेश पवार, श्री. संजय ऊर्फ बापू सुर्वे, श्री. स्वप्निल सुर्वे, श्री. संजोग आंबेरकर, श्री. निखिल लोध, श्री. सचिन कदम, श्री. लीलाधर आंबेरकर यांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले. हा फळवाटप कार्यक्रम राष्ट्रयोगी नरेंद्रजी मोदी यांना समर्पित असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाचे वृत्तांकन श्री. योगेश मुळे यांनी केले.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !