( संगलट – खेड / इक्बाल जमादार )
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी व खेडचे सुपुत्र हनीफ घनसार यांच्या विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीने पंजाब, अमृतसर येथे होटेल सुवर्ण ताज येथे विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
हनीफ घनसार हे खेडचे सुपुत्र आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत आहेत. जेसीज, लायन्स क्लबसह अशा अनेक संघटनेशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत असून त्यांचा उद्योग क्षेत्रातील संपर्क दांडगा आहे. प्रतिवर्षी ते कोट्यवधींचा व्यवसाय करतात. छोट्या मोठ्या गोष्टींचा विमा उतरविला जातो की नाही, याचे प्रबोधन सुध्दा करीत समाजात जनजागृतीचे कार्य करतात. त्यांचा विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांना सीएमडी क्लब सदस्य म्हणून कंपनीच्या चेअरमन निरजा कपूर यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. तसेच देश पातळीवर सर्व सीएमडी क्लब विकास अधिकारी मध्ये नफा टक्केवारीत त्यांनी व्दितीय क्रमांक मिळविल्याने अमृतसर, पंजाब येथील हाॅटेल ताज मधील कार्यक्रमात विशेष सम्मान स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सतत उत्कृष्ट विमा व्यवसाय करून ग्राहक सेवा देणारे श्री हनीफ़ घनसार यांना या सम्मानाबद्दल अनेक हितचिंतक, ग्राहक यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.