बिनधास्त,बोल्ड आणि बेधडक अशी इमेज असलेली मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या हटके स्टाईल ने नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. एका वेब पोर्टल ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या बोल्ड भूमिकांबद्दल विचारण्यात आले, या मुलाखती दरम्यान तिला ‘न्यूड सीन’ देण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले.
नेहा ने ‘भविष्यात न्यूड सीन देण्यास मला कोणतीही समस्या नाही. पण केवळ अशा चित्रपटांमध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरत असते’. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटायचे की, ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन.
चांगल्या चित्रपटांमुळे मला एक गोष्ट कळली ती ही कि,जर चित्रपटाचे निर्माते चांगले असतील आणि असे सीन ते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि न्यूड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन’ असे उत्तर तिने दिले.
सध्या हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘भाभीजी घर पर है.’ या मालिकेत अनिता भाभीची भूमिका नेहा पेंडसे साकारताना दिसत आहे. तिला या भूमिकेत पाहताना चाहत्यांना आनंद होत आहे.