(रत्नागिरी)
ग्रीन पार्क न्यू कोकणनगर झोपडपट्टी येथे अनेक वर्ष विद्युत पोल नसल्याने स्थानिक नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या स्थितीबाबत सौ सायमा काझी यांनी स्थानिक नागरिकांना घेवून महावितरणचे ॲडिशन इंजिनिअर श्री वाय. टि. तिरमोरे यांना निवेदन दिले. तत्काळ या ठिकाणी पोल बसविण्यास यावेत अशी मागणी त्यांनी महावितरण कडे केली आहे. यावेळी श्री तिरमोरे यांनी लवकरात लवकर पोल बसविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थितीत महिला शहराध्यक्षा सौ नेहाली नागवेकर, शहर उपाध्यक्षा सौ सबरीन लालू, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्षा सौ आलिया मजगावकर, कोकणनगर नागरिक श्री शहिद खान भाई, सौ अबिदा सनदी, सौ नाहिबी शाहा, सौ हलीमा शाहा, सौ माधवी कोळी, सौ तैमिना गोलंदाज, सौ झीनत नायकवाडे, सौ तस्लिम मुजावर, सिदू कोली, श्री शौकत फणसोपकर व अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.