(नवी दिल्ली)
केंद्रातील मोदी सरकारने आधी नोटबंदी केली, पण काळ्या पैशाला आळा घालण्यात त्यांना यश मिळाले नाही. आता हे २००० रुपये बंद करण्याचा निर्णय म्हणजे नवे नाटक आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे.
एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन सहजपणे २ हजारांच्या नोटा बदलता येतील. यावरून चिदंबरम यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे. ओळखपत्राशिवाय २ हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असतील तर तुम्हाला काळा पैसा शोधण्यात कशी मदत होईल, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा भाजपचा व आता फसल्याची टीकाही त्यांनी केली.
२०१६ मध्ये २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर लोकांनी लगेचच त्या घेणे बंद केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांकडे २ हजार रुपयांच्या नोटा नाहीत. दैनंदिन किरकोळ व्यवहारांसाठी या नोटा योग्य नव्हत्या, असेही चिदंबरम म्हणाले.