टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) काल 15 ऑक्टोबर रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, पैशासाठी नोकरी देण्याच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, टीसीएसने 16 कर्मचारी आणि 6 कंपन्यांना बडतर्फ केले आहे. याप्रकरणी कंपनीने एकूण 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
एका व्हिसल ब्लोअरने कंपनीच्या सीईओ आणि सीओओला पत्र लिहून आरएमजीचे ग्लोबल हेड ईएस चक्रवर्ती उमेदवारांना नियुक्ती देताना स्टाफिंग फर्म्सकडून लाच घेत आहेत असा दावा केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी कंपनीकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली गेली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
या चौकशी दरम्यान टीसीएसमधील मॅनेजर लेव्हलच्या एकाही कर्मचाऱ्याचा सहभाग नसल्याचं स्पष्ट झालं आहे. टीसीएस 6 व्हेंडर्स, त्यांचे मालक आणि त्यांच्याशी संलग्न कंपन्यांशी इथून पुढे कोणताही व्यवसाय करणार नसल्याचं स्पष्ट करत ही कारवाई करण्यात आली आहे.
भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर टीसीएसने आपल्या भरती प्रमुखांना रजेवर पाठवले होते आणि चार आरएमजी अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे होतं. सोबतच तीन स्टाफिंग फर्मवर बंदी घातली होती. आता 16 जणांना घरचा रस्ता दाखवला आहे तर तिघांना व्यवस्थापन प्रक्रियेतून बाजूला केलं आहे.
देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीच्या 28 व्या सभेला संबोधित करताना टाटा सन्स (Tata Sons) चे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले होते की, ‘TCS त्याच्या पुरवठादार व्यवस्थापन प्रक्रियेचे पुनरावलोकन करेल आणि नियम अधिक कडक करेल. यामुळे कंपनीत नुकत्याच झालेल्या नोकरीतील घोटाळ्यासारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री देता येईल.’
.TCS concludes its investigation into resource management function; investigation found 19 employees to be involved and action has been taken against all as detailed here – 16 employees have been separated from the Company for code of conduct violations, and 3 employees have been… pic.twitter.com/nZH7y9BFkn
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) October 15, 2023