(रत्नागिरी)
रत्नागिरीत काल गुरुवारी 30 जून रोजी दिवसभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. या भर पावसातच रत्नागिरी तालुक्यातील नेवरे भंडारपुळे रस्त्यावर दरड कोसळली. मात्र या मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. तर खेड तालुक्यातील मौजे खोपी जांभळेवाडी येथील 7 कुटूंबातील 24 जणांचे दरड येथील जि. प. शाळेत स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 545 मिमी आणि सरासरी 60.56 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती प्राप्त झाली.