(देवरुख / सागर मुळ्ये)
संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघटनेच्यावतीने कु. निलिमा सुधाकर चव्हाण हिचा संशयास्पद मृत्यूचा तात्काळ तपास करुन आरोपीला कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन संगमेश्वर तहसीलदार यांना दिले.
चिपळुण तालुक्यातील मौजे ओमळी येथील नाभिक समाजातील हुशार व होतकरू तरुणी कु. निलिमा सुधाकर चव्हाण ही शनिवार दि. २९ जून पासून बेपत्ता होती. १ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत मिळून आला. तिचा घातपात झाल्याचा संशय तिचे नातेवाईक व संपूर्ण नाभिक समाजाला वाटत आहे.
सदरहू घटनेचा तपास करून आरोपीला तात्काळ अटक करून त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊन निलिमा व तिच्या कुटुंबियाना न्याय मिळवून द्यावा ही नाभिक समाजाची मागणी आहे. तरी सदर मागणीचा विचार करून तात्काळ आरोपीवर कारवाई व्हावी ही नम्र विनंती. असे निवेदन तहसीलदार अमृता साबळे यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अभिजीत चव्हाण, प्रकाश चव्हाण, मंदार चव्हाण, मनोज चव्हाण आदींसह सभासद उपस्थित होते.
फोटो – संगमेश्वर नाभिक समाज संघटनेतर्फे कु. निलिमा हिच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीला पकडून शिक्षा करावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देताना पदाधिकारी.