(गणपतीपुळे / वैभव पवार)
सामाजिक क्षेत्रात मागील अनेक वर्षे सातत्याने करत असलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या दैनिक झुंजार केसरी यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी गावचे सुपुत्र महेंद्र पांडुरंग आग्रे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा जवाहरलाल दर्डा समाज भुषण राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ जाहीर झाला आहे.
महेंद्र आग्रे यांनी सामाजिक क्षेत्रात अत्यंत तळमळीने उल्लेखनीय काम केले आहे.त्यांनी मागील अनेक वर्षे ग्रामीण भागातील विविध ठिकाणी आपल्या सामाजिक कामाची छाप उमटवून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.या संपूर्ण प्रभावशाली कामगिरीची दखल घेऊन त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा असा जवाहरलाल दर्डा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना रत्नागिरी तालुका विधानसभा क्षेत्रप्रमुख गजानन तथा आबा पाटील यांचेसह निवेंडीतील प्रतिष्ठित नागरिकांनी खास अभिनंदन केले आहे.