आज पाली ग्रामपंचायत सभागृहात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा तसेच नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, येणाऱ्या अडचणी, भू संपादनाच्या मोबदल्या संदर्भातील प्रलंबित विषय इत्यादी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
▪️भू संपादन विषयक प्रलंबित निवाडे तातडीने करून मोबदला वेळीच देण्यात यावा.
▪️महामार्गाच्या कामामुळे बाधीत होणाऱ्या नळपाणी योजनांच्या पाईपलाईनचे काम प्राधान्याने सुरू करावे. या कामावर जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळीच काम पूर्ण करुन घ्यावे.
▪️कोणा प्रकल्पग्रस्तांची भू संपादन संदर्भात तक्रार असेल तर शासकीय यंत्रणेकडून मोजणी करून तक्रार निवारण करावी.
▪️इलेक्ट्रिक लाईनचे पोल योग्य अंतरावर आहेत का याचे सर्वेक्षण करून स्ट्रीट लाईटची सर्व्हिस लाईन टाकून घ्यावी.
▪️निवळी तारवेवाडी येथील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे अंडरपास करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा.
▪️अनेक ठिकाणी गाव रस्त्यामुळे दोन भागात विभागल्याने शेतीवाडी, रहदारी, तसेच विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे ,अशा निवळी रावणांगवाडी, निवळी तारवेवाडी, पाली, खानुमठ,आंजणारी,
वेरळ, आय. टी. आय.,लांजा,
वाकेड या ठिकाणी अंडरपास करण्याचे नियोजन करावे.
▪️ज्यांनी मोबदला घेऊनही बांधकामे हटविली नाहीत अशी बांधकामे तात्काळ हटवा. प्रश्न सामंजस्याने मिटत नसेल तर पोलीस संरक्षण घेऊन बांधकाम हटवावे.
▪️पाली तिठ्यातील शिवाजीमहाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करून अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात नियोजन करावे.
इत्यादी निर्देश देऊन मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करुन सर्व्हिस रोड दर्जेदार करावेत अशा सूचना दिल्या. या आढावा बैठकीला, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे, लांजा नगरंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते महम्मदशेट रखांगी, महावितरणचे अधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, भू संपादन अधिकारी, लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी, निवळी व पाली गावचे सरपंच, रस्ता चोपदरीकरण कामाचे ठेकेदार, समस्याग्रस्त ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.